सतीश रावलॅ, तुमच्या या चर्चाप्रस्तावातलं मला तरी एक अक्षरही समजलं नाही. तुम्ही तसेच शुभानन गांगल किंवा इतर जे मनोगती व्याकरण, भाषा, शुद्धलेखन यांबाबत काही नवे विचार मांडू पाहता ते नेहमी उदाहरणासहित सांगितले तर खूप बरे होईल. जेणेकरून कशाला तुमचा आक्षेप आहे आणि त्या जागी नवे काय हवे आहे ते लवकर स्पष्ट होईल. अन्यथा दर काही दिवसांनी असले भारंभार चर्चाप्रस्ताव मांडून (सध्यातरी) काहीच साध्य होत नाहीये.
-सौरभ.