गजाने स्वतःच्या पोत्याचा तळ उसवून आणला होता व त्याला सुतळीने घट्ट बांधले होते.

बजाच्या पोत्याचे तोंड त्याने सोडले व गहू स्वतःच्या पोत्यात भरले. गहू भरताच सुतळीने स्वतःच्या पोत्याचे तोंड घट्ट बांधले. 
वर तसेच २/३ (दोन तृतीयांश) पोते रिकामे राहिले त्यात त्याने तांदूळ भरून घेतले व उरलेल्या सुतळीने पोते बांधून घेतले.
मग स्वतःच्या पोत्याच्या तळाची (जो उसवलेला होता) सुतळी सोडून खाली असलेले गहू बजाच्या पोत्यात भरले व त्याला चालता केला.