आपले लेख वाचून मला एक कुतुहल निर्माण झालेले आहे.

आपण केवळ व्याकरण शुद्धलेखनावर अभ्यासपूर्ण लेखनच करता की आपल्या नव्या विचारांचा अवलंब करून आपण काही ललित लेखनही केलेले आहे? आपण जर ललित लेखन करत असाल तर प्रश्नच नाही. नसाल तर आपल्याला एक मित्रत्वाचा सल्ला आहे. आपले हे नवे विचार योग्यप्रकारे वापरून आपण त्यानुसार विपुल ललित लेखन करीत जावे. म्हणजे आपले विचार नीटपणे समजत जातील आणि आपोआपच आपला एक रसिकवर्ग तयार होऊन आपले विचार समाजात मूळ धरतील आणि जोमाने फोफावतील.

तज्ज्ञांना विचार पटवत राहण्यापेक्षा रसिक वाचकांद्वारे आपला हेतू लवकर साध्य होईल असे वाटते.