प्रत्येकवेळी दोन वस्तू म्हणजे एक जोडी हलवायही ह्याचा अर्थ ज्या दोन वस्तू हलवल्या त्या एकमेकींच्या जागी ठेवायच्या की त्या दोन वस्तू इतर दोन वस्तूंच्या जागी ठेवायच्या? समजा मी पे आणि रू ही जोडी हलवली म्हणजे पे हा रू च्या जागी ठेवला आणि रू हा पे च्या जागी ठेवला असेच करायचे ना? मग तिसरा नियम कसा लागू करता येणार? समजा असे नसेल आणि पे रू ही जोडी हलवून ती इतर दोन वस्तूंच्या (जोडीच्या) जागी ठेवताना पे रू ही जोडीजशीच्या तशी ठेवली आणि ती रू पे अशी ठेवली नाही तर तिसरा नियम लागू होईल. मात्र अशावेळी दोन जोड्या एकावेळी हलवल्या असा अर्थ होईल आणि पहिला नियम लागू होणार नाही. थोडक्यात मला नियम नेमके समजलेले नाहीत. त्यामुळे कोडे सोडवता येत नाही. कृपया खुलासा करावा.