काही नवे, अपरिचित घडवायचे असेल तर त्यासाठी जे जुने, प्रस्थापित आहे ते तोडून, जाळून टाकले पाहिजे असा काही क्रांती करणाऱ्यांचा रास्त समज असतो. मराठीतल्या व्याकरणाचे नियम शून्य असावेत, ऱ्हस्व - दीर्घ, श- ष यातले फरक असल्या फालतू गोष्टी काढून टाकाव्यात आणि मराठीला एक सोप्पी बोलीभाषा करावी, अगदी लिहितानाही आपण बोलतो तसे, 'गं, ऐक्लस्का, उशीरोणारे मला, जेवाच्स्लंतुला तर्जेवूंघे' असे लिहावे ही असलीच एक दिव्य क्रांती. 'हि, अप्रत्यक्शच, वरचश्मा, हासांगाडा' असे शब्द वापरून रावले यांनी स्वतःपासून या क्रांतीची सुरुवात केलीच आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
'नाय, इ काय हंतो दादा, लय डांगडिंग करतंय हे खाडं, करून टाकू का त्याचं नष्टर... ' यासारखे उतारे मराठी पाठ्यपुस्तकात येतील तो सुदिन. (की सुदीन हो? अर्थात काय फरक पडतो म्हणा! ) ओठाला लिपस्टिक लावली असली की काही अक्षरे उच्चारता येत नाहीत, मग ती जशी उचारली जातात तशीच लिहावी. तोंडात गुटखा असतानाही असाच प्रश्न पडतो, पन वांधा नाय भाऊ. शेवटी काय, पब्लिकला कळणे महत्त्वाचे. (एका उत्तरपत्रिकेत एका विद्यार्थ्याने ' आय वेंटेड' असे लिहिले होते. मला कळले बुवा. ( खरा उच्चार 'बॉ' असा आहे! ). मी पैकीच्या पैकी मार्क दिले) पोटफोड्या 'ष' हल्ली कोण वापरतो? 'बावर्ची' मध्ये 'भोर आयी गया अंधियारा ' गाण्यात 'अपनी भाषा में बोलो' असं खडसावणाऱ्या हरिंद्रनाथ चटोपाध्यायांचा जाणीवपूर्वक म्हटलेला 'ष' बगा. येडा था बुढ्ढा. भाषा म्हनलं तर पब्लिकला कलनार की न्हाय कलनार दादा? त्यो अमिताब आपल्या बापाची कविता म्हनताना 'महत्वाकांक्षा' अगदी बामनावानी म्हंतो. येडंच हाय तेबी.
इंग्रजी भाषेतील व्याकलनामध्ये हे चापल्य आहे, म्हणूनच इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढतंय.
हे अगदी पटलं सतिशदादा. आता एक काम करा, विलासरावांना सांगून महाराष्ट्रातल्या शिक्षणाचं सगळं तुमच्या हातात घ्या. वाटल्यास गांगलांना मदतीला घ्या. सगळं व्याकरण बिकरण गेलं चुलीत. झटक्यात सगळे इंग्लिश मिडियमवाले आणि कॉन्व्हेंटवाले मराठी शाळा सुरू करतात की नाही बघा. कराच एवढे तुम्ही...