मी शनिवारवाड्याजवळ कॉट बेसिसवर राहतो. माझ्या रुममेटस बरोबर मी अनेकदा शनिवारवाड्याच्या प्रांगणात गप्पा मारत वेळ घालवित असतो. तेथे येणाऱ्या जोड्यांना स्वतःला प्रायव्हसी तर मिळत नाहीच पण तेथे येणाऱ्या बाकीच्या लोकांनाही त्यांचा व्यत्यय येत असतो. त्यामुळे अशा जोड्यांसाठी काही स्वतंत्र सुविधा असावी असे वाटते.मी  वाचले आहे की काही आदिवासींमध्ये अशा प्रकारच्या (उपवर-वधूंच्या परस्परपरिचयाच्या कार्यक्रमांतून लग्ने जुळविणे, इ. ) चालीरिती आहेत.अशी काही सुविधा सुरक्षिततेचा विचार करून व काही बंधने घालून असावी असे वाटते.