गझल लेखनाचा हा प्रयत्न चांगला आहे. पण तंत्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
काही सुचवण्या करीत आहे.
वाट संपता माझा प्रवास होतो
पावले कशी वेड्या भरात आहे?
---- पहिली ओळ: अर्थ स्पष्ट नाही.यात वाट संपली तरी पाऊले वेड्या भरात चालतच राहतात असा आशय अभिप्रेत असेल तर
वाट संपली, माझा प्रवास नाही!
पावले कशी वेड्या भरात आहे?--- असे काहिसे म्हणावे लागेल.
चुकवुनी रस्ता निघून मरण गेले
वेदना अशा माझ्या घरात आहे... कल्पना स्पष्ट होत नाही.
सोसतो असा आजकाल मज मी
आसवे बरी साध्या दरात आहे--- कल्पना स्पष्ट होत नाही.
वाळवंट रे हे बाग का खुलावी?
मेघ त्या कितीसे अंबरात आहे?--- कल्पना स्पष्ट होत नाही.
चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी
काजळी कशी ही चांदरात आहे?-- हा शेर ठीक!
पु ले शु
जयन्ता५२