Shuddha Marathi,
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि भाषांतराचाच विचार करायचा झाल्यास तुम्ही दिलेले पर्याय अगदी योग्य आहेत. पण ती छटा काही मिळत नाहीये.

'काश'मधील नज़ाकत हाच गुण मला हवाय. मी जी छटा म्हणत होतो ती ही नज़ाकतच. ही नज़ाकत जर-तर, कारण, केवळ-म्हणून किंवा म्हणून-अन्यथा मध्ये नाहीये.
काश! मला 'काश'साठी एखादा शब्द सुचता!!
पण हो, जोवर सुचत नाही तोवर 'काश' आहेच. (जसा वरच्या वाक्यात आहे.)