आपण दिलेला प्रतिसाद आवडला.. आभार!

गझल प्रांतात नवीन आहे. आत्ता कुठे लिखाणास सुरुवात केली आहे.

हळूहळू सुधारेल असे वाटते... बघूयात काय होते ते!

आपले मार्गदर्शन लाभदायक ठरेल!

मी माझ्यापरिने मांडलेले अर्थ इथे देत आहे या शेरांचे! ते रास्त आहे का, माझ्या शेरांमधून तसे अर्थ प्रतित होतात का ते या प्रश्नांची उत्तरे मी तरी नाही देवू शकत. आपल्यासारख्या जाणकार कवी, रसिकांचे मार्गदर्शन अभिप्रेत!

१)

वाट संपता माझा प्रवास होतो
पावले कशी वेड्या भरात आहे? आजवर वाट होती पण प्रवास असा झालाच नाही. फक्त चालणे झाले. प्रवास नाही. आणि आता जेव्हा वाटच संपली, चालण्याकरता काही उरलं नाही तेव्हा या पावलांनी निरर्थक प्रवासास सुरुवात केली.

२)

चुकवुनी रस्ता निघून मरण गेले
वेदना अशा माझ्या घरात आहे

इतर लोक, आप्तेष्ट वगैरे यांची गोष्ट दूरच. माझ्या मनात,घरात इतक्या वेदना आहेत की, स्वःत वेदनादायी समजणारे मरणही या माझ्या वेदना बघून घाबरते आणि मला दूर करते स्व:तपासून.

३)

सोसतो असा आजकाल मज मी
आसवे बरी साध्या दरात आहे ... मी मला सोसतो आहे. कुणी नाही मला सोसण्यासाठी. आणि मी मला सोसतो कसा? तर आसवे ढाळून . बरं झालं आसवे माझी स्वःतची आणि स्वस्त आहेत.

लोभ असावा!