-
-
ललीत लेखन करणं हा माझा प्रांत नाही. नीव्वळ मराठी भाषेच्या साथीने संगणकाला गूलाम करता आले पाहीजे हे माझं म्हणण आहे. जेणेकरून भवीश्यात मराठीतून संगणक आद्न्यावली लीहीता येवून राज्याचा राज्यकारभारापासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांना त्यातून संगणकाचे अनेक फायदे पोहचू शकतील.
व्याकरणाच्या आधी लीपी चे नीयम येतात. म्हणजे वर्ण , स्वर व व्यंजन ह्याची आप-आपसातील सांगड. त्यांच प्रकट रूप म्हणजे त्यांची चीन्हे. सध्यातरी जी स्वर व व्यंजनांची सांगड आपल्या मनात असते ती चीन्हांच्या रूपात जशीच्या तशी प्रकट होत नाही आहे.
सध्यातरी मराठी भाषे साठी इंग्रजी अल्फाबेटस मनात घोळवून फोनेटीक टंकन करणं हेच बहूतेक जणांना जड जातंय. मी स्वत: महाराष्ट्र शासन प्रमाणित टंकनाचे रीतसर प्रशिक्शण घेतलेले आहे. पण ते गोदरेज च्या टंकलेखनयंत्रावरचे होते. म्हणून दोन्ही टंकन प्रकार लक्शात ठेवण्यातून खूप त्रास होतो.
तज्ज्ञांना विचार पटवण्या आधी सामान्य मराठी जनतेच्या मनाचा कौल समजून घेण्याचाच मी प्रयत्न करीत आहे. यात काही चूकीचं आहे कां?
तूझ्या मित्रत्वाचा सल्ल्याबद्दल मी आभारी आहे.