प्रिय सतीशराव,
अ.
काळ बदलतोय, नव्हे तो बदलत असतो. बदलत्या परिस्थितीनुसार विचार
करण्याची, उच्चार करण्याची पद्धत बदलत जाते व त्यामुळे त्यानुसार आपली
भाषाही बदलत जात आहे. भाषा बदलण्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यातील
ढोबळमानाने तीन प्रकार खालील प्रमाणे.
१. नवीन शब्दांचा वापर
२. नवीन उच्चार
३ नवीन वाक्यरचना
४ लिहीण्याची /टंकनाची पद्धती - लिपी
यातील
पहिले दोन व शेवटचा प्रकार आपण सवयीने, प्रयत्नाने एखादा विद्यार्थी वा
भाषिक आत्मसात करू शकतो. पण तीसरा प्रकार आत्मसात करण्यासाठी योग्य
शिक्षणाचीच गरज असते.
अ.
त्यासाठी 'व्याकरणाची मांडणी' व्यवस्थित हवी. सध्यातरी आपण व्याकरणाच्या
पुस्तकातील अक्षरांनाच 'व्याकरण' म्हणतो. ते 'व्याकरण' नसून ती
'व्याकरणाची मांडणी' आहे. मुळात 'भाषेचे व्याकरण' हे विचार करण्याच्या
पद्धतीमध्ये दडलेले असते. ते अदृश्य असते.
वरील दोन उताऱ्यांत तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते सोदाहरण स्पष्ट केल्यास आनंद होईल, आभारी राहीन. लिहिण्याची/ टंकनाची पद्धत आणि व्याकरणाचा संबंध काय हे उलगडून दाखविल्यास बोनसच. अन्यथा माझ्यामते हे बोबडे 'व्याकलन' अनाकलनीय आहे, असेच म्हणावे लागेल.
आगाऊ धन्यवाद देतो.