गजाने वीस किलोचे रिकामे पोते जमिनीवर अंथरले, पोत्याच्या अर्ध्या भागावर बजाच्या पोत्यातल्या वरच्या कप्यातील गहू जपून ओतले. उरलेल्या अर्ध्या भागावर खालच्या कप्प्यातील तांदूळ जास्तच जपून ओतले. मग गहू बजाच्या रिकाम्या झालेल्या पोत्यात भरले. अंथरलेल्या पोत्याच्या तांदूळ असलेल्या भागाला फारसा धक्का न लावता उरलेला भाग सुतळीने घट्ट बांधला व त्याचे एक छोटे पोते केले. ते उभे धरून अंथरलेल्या पोत्यावरील तांदूळ त्यात भरले.
(टीपः वीस किलोच्या पोत्याचा आकार डोळ्यासमोर येत नाही आहे पण तो पुरेसा मोठा असेल असे गृहीत धरले आहे.)