हेमंत,
रेफर करणे-करवणे न आवडणे हा माझा व्यक्तिगत तत्त्वाचा मुद्दा आहे. कोणाच्यातरी वशिल्याने कोणीतरी कुठेतरी पोहोचण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने जर कोणाला एजन्सी वा कंपनीने स्वतःहून बोलवणे पाठवले तर ते जास्त श्रेयस्कर वाटते .. अर्थात मला. सर्वांनाच असे वाटावे असे माझे म्हणणे अजिबात नाही.

> शिफारस करण प्रत्येक वेळेस चुकीच असतच अस नाही.
हे अगदी मान्य. त्याचाच तर अनुभव वर लिहिला आहे.

नरेंद्र,
जालावर वेगळ्याने असे काही लिहिण्याचा हा खरंच खूप दिवसांनंतरचा प्रयत्न आहे माझा. लेखनाशी पडलेल्या मधल्या या विरहानेच की काय आज बोटे उगाचच अडकत होती लिहिताना. एरव्ही कधीही किबोर्डकडे बघायची जरूर पडत नाही टंकताना पण आज हा लेख लिहिताना गडबडल्यासारखे होत होते आणि किबोर्डकडे बघून टंकन करावे लागले ! याच सगळ्या धबडग्यामुळे पुर्वी लिहायचे त्यापेक्षा खूपच छोटा झाला आहे हा लेख. दिवाळी अंकासाठी हात साफ करायलाच लिहिले होते एवीतेवी.. बऱ्यापैकी सफल झालाय हेतू असे वाटते तर आहे. बघते काय उजेड पाडता येतो ते.

प्रथम,
मनाबद्दल मी काय बोलणार?

प्रदीप,
>हा इंग्रजी - हिंदी - झालंच तर मराठी- अनुभव खरंचंच खूप वेगळा वाटला हां. :)
अग्गदी खरे सांगायचे तर मला वाटलेच नव्हते की हा लेख मनोगतवर राहिल असे.. कारण भाषांचा गोपाळकाला झालाय ना यात एकदम. अर्थात तसा तो मुद्दाम केलेला नाही म्हणा.. त्यामुळे काय बोलणार?
> जीव नॉनव्हेज असतो?  फारच रुचकर असणार... :)
हाहाहाहा.. जीव नॉनव्हेज असतो ही मौमची थेअरी आहे. ती आपसूक माझ्यातही उतरलीये हे मला आत्ता तुमच्या प्रतिसादावरून कळले. रुचकर असणार की नाही ते सांगू शकत नाही कारण मी नॉनव्हेज खात नाही ना.. !
>त्या हसण्यातला अर्थ इतर कोणालाही समजता येणार  नव्हता... या वाक्याचा अर्थ मलाही समजता नाही आला !
ही वाक्यरचना प्रमाणभाषेत बरोबर आहे की नाही माहिती नाही पण बोलीभाषेत आम्ही असेच बोलतो त्यामुळे ते चुकीचे असल्यास कृपया दुर्लक्ष करावे.
> बाय हुक ऑर कुक (बाय हूक ऑर क्रूक) ही टंकलेखनातील चूक असावी.
खरंच की ! टंकलेखनात झाली खरी चूक. यापुढे काळजी घेईन.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार. हुरूप वाढलाच पण चुकाही कळल्या त्यामुळे जास्त बरे वाटत आहे.