प्रेम करावे का?
का नाही? जरूर करावे. भरपूर करावे. अगदी 'भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं' प्रेम करावे. पण प्रेम आणि लग्न ह्या दोन अतिशय वेगळ्या भानगडी आहेत.

माझे असे मत आहे की जर प्रेम-विवाह असेल तर दोघामध्ये भांडणे व्हायला नकोत. तुम्हाला काय वाटते.

प्रेमविवाह नसेल तर भांडणे झाली तर चालतील, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? असो.

आता थोडा आगाऊ 'आसाराम'पणा :
कुठल्याही संबंधांत, मग ते लग्न असो वा मैत्री, भांडणे व्हायला हवीत. भांडणांतूनही संबंध टिकले तर अधिक मजबूत होऊ शकतात, असा अनुभव आहे. जय गुरुदेव!