,प्रेमात पडतांना आपण म्हणतो लव्ह ऍट फर्स्ट साईट... आणि ठरवून केलेल्या लग्नात जेव्हा मुलगा-मुलगी एकमेकांना प्रथम बघतात, थोडेसे बोलतात आणि पसंत करतात, तर तेही लव्ह ऍट फर्स्ट साईटच असते. असो.
सांगायचा उद्देश असा की, लव्ह मॅरेज असो की ऍरेंज, त्या आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला हे गुणदोषांसकट स्वीकारले पाहिजे. मुमुक्षू म्हणतात ते खरे आहे. जसेच्या तसे स्वीकारणे.
पण... लव्ह मॅरेजमध्ये भांडणे लवकर सुरू होण्याची शक्यता जास्त असते कारण, लग्न होईपर्यंत दोघे एकमेकांना "चांगलेच" ओळखत / ओळखून असतात आणि लग्न होई होई पर्यंत एकमेकांबद्दलचे शारिरीक आकर्षण कमी झालेले असते, पण ऍरेंज मॅरेजमध्ये ते आकर्षण लग्नानंतर सुरू होते.
आणि मतभिन्नता कुठे नाही? मग नवरा-बायको तरी अपवाद कसे असणार?
"जर नवऱ्या-बायकोत कधीही भांडण झालेच नाही, तर समजावे की पाणी कुठेतरी मुरतेय.." असे बरेचसे जुने वयस्कर बुजुर्ग मंडळी सांगत असतात...
ते असेही म्हणतात की, "बहुतेक नवरा बायकोंची भांडणे बहुदा त्याच रात्री बेडवर मिटतात/मिटली पाहीजेत."..
आजच रात्री घ्या, सकाळी ओ. के.!! याप्रमाणे !!!
कारण बळकट लग्नसंबंधाचा पाया (सेक्स) पक्का हवा.
थोडेसे विषयांतर झाले बहुदा...!!
पण चर्चेच्या शिर्षकात विचारलेल्या प्रश्नाला मझे असे उत्तर आहे की :
प्रेम जरूर करावे. अगदी स्वतःपेक्षा जास्त आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीवर करावे... प्रेमासारखा मधुर, कोमल, तरल, शब्द/भावना दुसरी जगात नाही...