प्रतिशब्दकोश याचे अर्थ दुसरा शब्दकोश, प्रतिस्पर्धी शब्दकोश असे होऊ शकतात. तेव्हा प्रतिशब्दांचा कोश म्हणणे अधिक चांगले. किंवा परिभाषाकोश.
कोश आणि कोष हे एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत, पण मराठीत माहितीसंग्रहग्रंथाला कोश आणि फुलपाखरासारखे कीटक ज्यातून बाहेर पडतात त्याला कोष म्हणण्याचा प्रघात आहे. तसाच रेशमाचाही कोष.