पण मी काही त्या फंदात पडलो नाही, मी भिकारणीला मराठी शिकवण्यापेक्षा तिनेच मला भीक मागायला शिकवण्याचा योग अधिक वाटला.

मला गुलाम अलींचं चुपके चुपके रात दिन...... "च" आवडतं. त्याच्यावर मराठीची सक्ती करणं,माझ्या सळसळत्या मराठी बाण्यालाही नाही जमलं. शेवटी जुनी कॅसेट काढून ते गाणं पूर्ण एकलं, "राज" ची मनोमन माफी मागितली,आणि भरल्या पण शांत मनानं झोपून गेलो.

फारच छान! आवडले, पटले, हसू आले :) एकंदरच गडद विनोद वाटला,आवडला.

लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच. आणखी खुलवता आला असता/खुलला असता, असेही वाटून गेले. असो.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.