मला वाटते विंडोज फक्त इनस्क्रिप्ट हे एकच माध्यम वापरते. फायरफॉक्सचे एक्स्टिंशन वापरून इनस्क्रिप्ट, आरटीएक्स व डब्ल्यू एक्स अशा तीन वेगवेगळ्या पद्धतीने मराठीत टाईप करता येते. आरटीएक्स (फोनेटिक)  पद्धत (काही फरकाने) मनोगतावरही वापरली जाते व ती सगळ्यात सोपी आहे. उदा. स्टार माझा  हे "sTaar maajhaa" असेही टंकित करता येईल. इनस्क्रिप्ट मात्र नव्याने शिकावे लागेल.