प्रदीप,
>मौमिताचा अर्थ काय? हे बंगाली-आसामी नाव आहे का?
मौमिता हे बंगाली नाव आहे ( आसामीबद्दल माहिती नाही ) कारण माझ्या आजवरच्या दोस्त असलेल्या दोघी मौमिता बंगालीच आहेत. बंगालीमध्ये मोहू म्हणजे मध आणि मिता म्हणजे मैत्रिण.. मधासारखी गोड मैत्रिण असा काहिसा अर्थ असावा.
चिन्नु,
>हा प्रसंग वाचून तुमच्याबद्दलचा आदर वाटला.
काय बोलावे सुचेना असं बोललात !
> अशीच छान छान काम करायला परमेश्वर तुम्हाला मदत करो!
आमेन !
>आपको माननेवालोंके काफिलेमेसे :)
बापरे ! तुमच्या या विश्वासाला पात्र ठरण्यासारखे लेखन करण्याची मला सद्बुद्धी सुचो.. !
मुशाफीर,
>बऱ्याचं दिवसांनी आपणं लिखाणं केलंत, हे वरील प्रतिसाद वाचून कळले. पण आता त्यात खंड पडू देऊ नका, हीच
>विनंती.
मलाही आता वाटतेय लिहावेसे. लिहीनच. :)
>लेख फार छान आहेच आणि त्यातला शेर तर फारच सुंदर!!
लेख मी लिहिला आहे पण एसेमेसमध्ये लिहिलेला शेर मात्र माझा नाही. कुठूनसा आलेला आहे तो वापरण्याची संधी मुफीने दिली इतकेच काय ते.
दुसरी,
>वाचून डोळ्यात पाणीच आले!
शिवाजींना नोकरी मिळाली हे ऐकून मी इतकी आनंदीत झाले होते की माझीही अशीच परिस्थिती झाली होती.
प्रदीप, चक्रमादित्य, चिन्नु, मुशाफिर, दुसरी, कुशाग्र, प्रतिसाद देऊन हौसलाअफजाई केल्याबद्दल मनापासून आभार.