स्पीडसाठी वेग हा घरोघरी वापरला जाणारा रूढ शब्द आहे, तो बदलण्याचे कारण नाही. गती म्हणजे मोशन, त्यामुळे तोही शब्द योग्य नाही. व्हेलॉसिटीसाठी वेगळा शब्द हवा. आवेग-प्रवेग-संवेग सारखा. स्टॅटिक(टी नव्हे) म्हणजे अचल त्यामुळे स्थिर किंवा अचल वीज. आणि दुसरी प्रवाही वीज. विद्युद्धारा नको, विद्युत्प्रवाह रूढ आहे, किंवा विजेचा प्रवाह. व्होल्टजसाठी विजेचा दाब याहून दुसऱ्या शब्दाची गरज नाही. इलेक्ट्रिसिटी(क्ट्री नाही), तसेच स्पिन(स्पी? ) साठी चक्कर, रोटेशनल-चक्राकार गती.
डायमन्शनलेस(न्ले नाही)साठी मितिमुक्त. (मिती नाही). टॅन्जन्ट साठी स्पर्षरेषादेखील चालेल. हे आघूर्ण अजिबात चालणार नाही, सोपा प्रचलित शब्द हवा. ततात्क्षणिक व्याकरणदृष्ट्या चूक-, तात्क्षणिक किंवा तत्काल.