वेदश्री, आपण शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला हवा आहे!

तुझा वरचा लेख नेहमीप्रमाणे ओघवता आहेच. मात्र अतिशय धेडगुजरी आहे. तू नेहमी अशीच बोलत असल्यास, तसे करणे चूक आहे अशी मनात खात्री बाळगावीस. विविधभाषक लोकांच्यात वावरतांना संस्कृती हळूहळू धेडगुजरी होण्याची दाट शक्यता असते. तेव्हा मराठी बोलतांना शुद्ध मराठी, हिंदी बोलतांना शुद्ध हिंदी आणि इंग्रजी बोलतांना शुद्ध इंग्रजी वापरणे चांगले. शिवाय, आपापसात बोलतांना जे स्थल, काल, व्यक्तीसापेक्ष पारिभाषिक शब्द दैनंदिन जीवनात आपण घडवत असतो ते सार्वजनिक लिखाण करतांना संदर्भासहित स्पष्ट करावेत. म्हणजे इतरांना अगम्य वाटत नाहीत.

म्हणूनच आपण सगळ्यांनीच शुद्ध बोलायला लागण्याची, शुद्ध लिहायला लागण्याची आणि लिखाणास स्थल, काल, व्यक्तीनिरपेक्ष बनवण्याची नितांत गरज आहे.

जे अत्यंत उत्स्फूर्त लिखाण करणारे मोजके महाजालीय लेखक आहेत त्यात तुझा अंतर्भाव आहे. म्हणूनच तुझ्या मनावर घेण्यालाही विशेष अर्थ आहे व म्हणूनच माझ्या सांगण्यालाही.