वादविवादांचा फारसा अनुभव नसावा असे वाटते. मी स्वतः असे बरेच वादविवाद पाहीले आहेत जे योग्य दिशेने सुरु झाले, पण कुणीतरी त्यात घुसवलेल्या पूर्णतः अस्थानी मुद्द्यामुळे त्यांना वेगळे आणि अनिष्ट वळण लागून त्यांचे भांडणात रुपांतर झाले व ते बंद पडले. या चर्चेचे तसे होऊ नये याच ईच्छेपोटी मी ती विनंती केली.
आता, मी उल्लेख केलेल्या वाक्यांबद्दल... लिखाण शुद्ध असावे की नसावे या चर्चेत, लिखाणाचे नियम ब्राह्मणांनी केले की इतर कुणी, हा मुद्दा येऊच कसा काय शकतो ? शुद्ध लिखाण ही काय एखाद्या विशिष्ट जातीचीच मक्तेदारी आहे का ?
बाकी, कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मी हा मुद्दा उपस्थित केला असेन, तर त्याचे कारण चर्चेला अनिष्ट वळण लावायचे म्हणून नाही, तर तसे लागू नये म्हणूनच. आता, जर एखादी व्यक्ती तिच्या नकळत खड्ड्याकडे चालली असेल, आणि तिला ते सांगितल्यावर, 'तुम्हीच मला खड्ड्याकडे जायला उद्युक्त केले' असे ती म्हणू लागली तर माझाही नाईलाज आहे. असो, चर्चेच्या या उपफाट्यावर पुष्कळ प्रवास झाला, आता मूळ मार्गाला लागावे हे उत्तम.