साधारणपणे, मराठी भाषेमध्ये समोरच्या व्यक्तीला आपल्यातली/लाच एक माणूस म्हणून गणण्याची प्रथा आहे आणि त्यामुळेच 'आपण जेंव्हा अमुक एखादी गोष्ट करतो तेंव्हा हे हे परिणाम होतात' अशा पद्धतीची वाक्यरचना केली जात असे असं मला वाटतं. यात काही चूक असल्यास तज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा.
कारण हल्ली इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली 'तुम्ही जेंव्हा अमुक गोष्ट करता तेंव्हा हे हे परिणाम होतात' अशी वाक्य सर्रास ऐकायला मिळतात आणि बऱ्याचशा वृत्तपत्रांमधून वाचायलाही मिळतात. या दोन्हींमधला आपण हा प्रयोग अधिक व्यापक आणि कदाचित सवयीचा असल्यामुळे कानाला अधिक बरा वाटतो. जरी अर्थाच्या दृष्टीने फार फरक पडत नसला तरी त्या त्या भाषेची स्वतंत्र वैषिष्ट्ये असतात असं वाटतंय. याबद्दल तज्ज्ञ खुलासा करतील का?
माझी मदत करा किंवा तिचा अपघात झाला याबद्दलही चुकीचे शब्दप्रयोग सर्रास रूढ होत आहेत का? या विषयाशी फारसा संबंध नसूनही एकदा नमूद करावंसं वाटलं इतकंच.
--अदिती