सतीशराव,
व्याकरणासोबत आपण गणितसुद्धा बदलू इच्छिता असे दिसते.
भाषा बदलण्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यातील ढोबळमानाने तीन प्रकार खालील प्रमाणे.
१. नवीन शब्दांचा वापर
२. नवीन उच्चार
३ नवीन वाक्यरचना
४ लिहीण्याची /टंकनाची पद्धती - लिपी
मला तर चार प्रकार दिसले बॉ! आपलं१ गणितच कच्चं आहे बहुतेक!! काय करणार?
(तसेही व्याकरण आणि गणित हे दोन विषय अनेक विद्यार्थ्यांचा घात करणारे आहेत. माझाही घात केलाय त्यांनी. त्यामुळे आपल्या गणित बदलण्याच्या मोहिमेसदेखील माझा संपूर्ण पाठिंबा आहे.)
१हे स्वतःस उद्देशून म्हणतोय, तुमच्यासाठी आदरार्थी बिल्कुल नाही. (म्हणजे तुमच्यासाठी आदर नाही असं नाही, फक्त वरील शब्द तुमच्यासाठी आदरार्थी नव्हता एवढंच म्हणायचं होतं मला. भलताच गैरसमज व्हायचा आपला!)