शेवटी 'व्हॉट मॅटर्स मोअर इज द प्रॉडक्टीव्हिटी'! >> अगदी. अगदी.

ह्याबाबत एक मजेशीर अनुभव मला सांगायचाय.

मी पहिल्यांदा मुंबईत आलेलो होतो तेव्हा ऑफीसच्या कँटीनमध्ये जेवण घेत असतांना मला कांदा हवा होता.
माझ्या त्यावेळच्या समजाप्रमाणे मुंबई कॉस्मॉपॉलिटन असल्याने इथे मराठीपेक्षा हिंदीच जास्त चालत असावे. बंबय्या हिंदी.
म्हणून "मी प्याज चाहिये" अशी मागणी केली. तो माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहू लागला.
मग वाटले की नागपूरपेक्षा मुंबईत इंग्रजी जास्त कळत असावे. म्हणून "I want onion" अशीही मागणी नोंदवली.
परिणाम शून्य. शेवटी हातानेच दाखवला कांदा. तर तो म्हणे "फिर कांदा बोलो ना!"

तेव्हा मला मातृभाषाच पुन्हा शिकण्याची पाळी आली होती.