मी माझ्या फायरफॉक्स चे अबाऊट पान पाहिले तर त्यात फायरफॉक्स ३. ० असे दिसत आहे. मात्र इंडिक इनपुट प्लगीन चे मोझिलाच्या वेबसाईटीवर पान पाहिले की तिथे एका वापरकर्त्याचा प्रतिसाद दिसतो त्यानुसार ते ३. ० बी ला चालत नाही असे त्याने म्हटले आहे.
मी प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला तर ही आवृत्ती कॉंपॅटिबल नाही असा संदेश येतो.
 
मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो. मात्र एक शंका आहे. आता आहे त्या आवृत्यांचे विसर्जन करावे  का? माझ्या मशीनवर फाफॉ २ आणि फाफॉ ३ दोन्ही आहेत त्याचा काही फरक पडेल का?