होय प्रेम कराव .प्रत्येकाला प्रेमाची गरज असते .पण प्रेम हे मना पासून केलेले असावे आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ते त्याच्या गुणदोषा सहीत करावे .प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्ती बद्दल वाटणार आकर्षण त्या प्रेमात आपण त्या व्यक्तीचे दोष पाहत नाहीत पण जेव्हा आपण त्याच्या सहवासात येतो तेव्हा त्याचे दोष हे लक्षात येतात .आणि गैरसमज र्निमाण होतात . प्रत्येकाची मत ही वेगवेगळी असतात म्हणून भाडंण होतात आणि जर का आपला आपल्या जोडीदारावर पुर्ण विश्वास असेल तर ती भाडंण किंवा वाद-विवाद कधीच टोकाला जाणार नाही. जर कोणत्या दोषा मुळे तुमच प्रेम कमी होणार असेल तर ती केवळ तडजोड असेल. प्रेम हे नेहमी निस्वार्थ भावनेनी करावे मग वाद झाला तरी तो आनंदाने दुर करता येतो.
मी तर अस म्हणेण की संसारा मध्ये थोडी फार भाडंण तर झालीच पाहीजेत तरच त्या मध्ये मजा आहे.तरच ते प्रेम हवहवस वाटणार आणि मधुर आहे.