प्रज्ञावंत मंडळी समोर प्रांजळपणे कबूल करतो की मी फक्त ह्या पालखीचा भोई बनू इच्छितो. 
ह्या चर्चेत शब्दांच्या व्याख्या/अर्थ/अचूकता वगैरे अपेक्षीत नसून असा शब्दकोष/श बनवता येईल का ?
त्याला कितपत प्रतिसाद मिळेल ?
त्याची उपयुक्तता आहे का ?
गरज आहे का ?
नसल्यास पर्याय काय ?
कोणी असे प्रयत्न ह्या आधीच सुरू केले आहेत का ?  
ह्यावर चर्चात्मक मते अपेक्षीत आहेत.

ह्यासोबतच भारुडात म्हटल्याप्रमाणे तक्त्यातल्या रकान्यांची संख्या वाढवता येईल का ? प्रतिसाद आल्यानंतरही लेखनात फेरफार (रकान्यांची संख्या वाढवून शब्दांची भर टाकण्यासाठी) करता येईल का ? जर अशी सोय पूर्ण तक्त्यासाठी सर्व मनोगतींना उपलब्ध करवून देता न आल्यास चित्त, महेश (हे उदाहरण आहे !) इ. सारखे नियमित मराठी शब्दांवरील चर्चेला तयार असणाऱ्या मंडळींपुरता  अशी सोय उपलब्ध करता येईल का ?

ह्या वर चर्चा / खल / हमरीतुमरी व्हावी ही नम्र विनंती !
(ह. घ्या. हे सां. न. ल.)
विशेष टीप : ह्या प्रतिसादा पुरता शुद्धलेखनाला फाटा देण्यात आलेला आहे !