शाळेतील विज्ञानाच्या पुस्तकानुसार पुढील शास्त्रीय शब्द शिकलो आहे. शास्त्रीय शब्दच घरोघरी रूढ व्हावेत असे नसले, तरी भौतिकशास्त्राच्या दृष्टीने त्या त्या संज्ञांचा विचार करता हे शब्द चपखल आहेत.त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या बिनचूक शब्द घरोघरी/दैनंदिन वापरात रुजण्यास प्रत्यवाय नसावा असे वाटते.

स्पीड = चाल
वेलॉसिटी = वेग
ऍक्सलरेशन = त्वरण (संवेग नव्हे! संवेग म्हणजे मोमेंटम्! आवेग म्हणजे इम्पल्स्)
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी = स्थैतिक विद्युत / स्थिरविद्युत. अचल वीज पेक्षा हाच जास्त योग्य/बरा वाटतो.

विद्युत प्रवाहाप्रमाणेच विद्युतधारा किंवा धाराविद्युत असाही शब्द शास्त्रीय परिभाषेत आहेच. तो वापरण्यास का बरे हरकत असावी? व्होल्टेज म्हणजे विभवांतर हे तितकेसे बरोबर नाही; वोल्टस् हे निव्वळ एकक आहे (विभवांतराचे - पोटेन्शिअल डिफ्रन्स चे). वोल्टेज ला विद्युतदाब हा विजेचा दाब पेक्षा अधिक चांगला/योग्य शब्द वाटतो.

टॅंजन्ट साठी स्पर्शिका हा शब्द गणितीय परिभाषेत रूढ आहे; स्पर्शरेषा पेक्षा तो बरा वाटतो.

तत्काल मराठमोळा आहे का? हिंदाळलेला/हिंदी आहे, असे वाटते. तात्काळ मराठमोळा आहे.