आधी गजाने आपल्या पोत्यात वरचे गहू भरले. त्याला वरतून दोरी बांधली मग ते पोते उलटवले (शर्टाची बाही उलटवतो तसे). म्हणजे आता पोत्याचा बाहेरचा भाग आत आणि आतला भाग बाहेर आला. म्हणजेच गहू भरलेलं "गाठोडं" आतल्या बाजूला (वर बांधलेल्या सुतळीसकट). मग त्याने तादूळ भरले आणि मग तांदळात हात घालून खालती बाजाचे पोते ठेऊन गव्हाच्या गाठोड्याची गाठ सोडली. गाठ सोडताच आतले गहू बाजाच्या पोत्यात पडले, आणि गजाला फुकट तांदूळ मिळाले.