बजाच्या पोत्यातले गहू गजाच्या पोत्यात भरायचे आणि गजाचे पोते तिरके करून पोत्याच्या खालच्या एकाच टोकाकडे गहू येतील अशा बेताने ( म्हणजेच दुसरे टोक मोकळे राहिल अशा बेताने ) सुतळीने बांधायचे. मग उरलेल्या भागात तांदूळ भरून दुसऱ्या बाजुने पोते कलंडवून पोत्याचे तोंड उघडे राहिलशा बेताने सुतळीने बांधायचे. आता अगोदर बांधलेली सुतळी काढून टाकून गहू बजाच्या पोत्यात टाकायचे ! झाले !
२० किलो मापाच्या पोत्यात १० किलोच्या धान्याचा हा खेळ खेळणे अवघड नाही असे वाटते तरीही पूर्ण शाश्वती वाटत नाहीये.