-

-

-

सध्या अस्तित्वात असलेली फोनेटीक टंकन पद्धतीला अजूनतरी मी व इतर काही मंडळी सोडून कुणीही विरोध करीत नाही आहे. म्हणून तो मुद्दा बाजूला ठेवूया.

चर्चा भरकटू नये ही माझी देखील ईच्छा होती/ आहे म्हणूनच मी लेखात वरील सूचना केली होती. पण प्रदिप शेठनी माझ्या संकेतस्थळ व सूबोध लीपीला नेम धरून गोळीबार सूरू केला. बरेच वाचक लेखातील मतीतार्थापेक्शा आधीच्या प्रतीसादांचा 'मूड' पकडून आपली मते सादर करताना (नकळतपणे का होईना) दीसतात.

तसे होवू नये म्हणूनच मी मंदार यांच्या लेखाला प्रतीसाद म्हणून हा लेख लीहीला आहे हे स्पश्ट केलेले होते. 'मदरबोर्डला' मात्ऱूफलक' असं भाषांतर करण्याला ज्यांनी वीरोध केला तीच मंडळी ह्या चर्चेत वीचीत्र प्रतीसाद देतात.

संगणकाचे हार्डवेअर आज ना उद्या बदलतील. मग नव-नव्या वस्तूंना नाव देण्यातच आपण आपली बूद्धी वापरणार का? आपल्यातील सूप्त गूणांनी नव्या संकल्पना, नवे शोध लावूनच आपण आपली बूद्धी तल्लख करू शकतो. व त्यामूळे आपल्या समाजाला ही फायदा होणार. पाश्च्यात्य मंडळी त्यांच्या गरजांनूसार, महत्त्वाकांक्शा नूसार शोध लावणार व त्यांनी अनेक चूका करीत शेवटी जे बरोबर वाटले ते लीहून ठेवणार. ह्या लीखीत माहीतीला आपण मात्र ज्ञान समजणार.  ज्ञान हे धाडसी व चीकाटीपूर्ण शोधात दडलेले असते, ते पूस्तकांमध्ये नसते.

ही मानसीकता टळावी. ह्यासाठीच व्याकरणात सूधारणा व्ह्यावी अशी माझी मानसीकता आहे. रोमन लीपी टंकन करताना एकाच दीशेने प्रवाहीत असते. लीपीचा, व्याकरणाचा मेंदूशी संबंध असतोच. लीपीची चर्चा येथे नको.

मंदार यांनी लेखात भाशेत बदल होत आहेत हे नमूद केले होते. त्याच अनूशंगाने मी म्हणत आहे की समाजाला एकसंध ठेवण्यासाठी लीपी व व्याकरण हे महत्त्वाचे कार्य साधतात. महाराष्ट्रातील शाळेत मराठी भाषेच्या व्याकरणाची गोडी कीती जणांना असते/ आहे? उत्तर नकारात्मक असेल तर, त्यासाठी उपाययोजना व्ह्यायला हव्यात. व्याकरणाची शीकवण जेवढी चांगली होईल तेवढे व्याकलन चांगले होईल. त्यासाठी व्याकरणाची मांडणी सूधारायला हवी. चांगले व्याकलनच नव-नव्या वीचारांचे ईमले उभे करू शकतं, मनोरे उभे करू शकतं. नाहीतर हेच चालू राहणार.. रींगटोन ला काय म्हणायचे? मदरबोर्डला काय म्हणायचे?

जोगळेकर म्हणतात-

चर्चा प्रस्ताव करणाऱ्याने खचितच त्या विषयावर बरेच मनन व चिंतन केलेले असते, परंतु आपल्या मनातील दहा वाक्यांपैकी चारच सांगितली तर वाचणाऱ्यांना त्याचा अर्थ उमगेपर्यंत अनेक फाटे फुटलेले असतात.

पण सगळेच पत्ते आधी दाखवले तर, चर्चेचा प्रस्त्वाव ठेवणाऱ्याने अनेक मूद्द्यांच स्पष्टीकरण द्यायचं की वेगवेगळ्या दीशेतून येणाऱ्या गोळीबारांपासून स्वतःला वाचवायचं?

एखाद्या मूद्द्यावर 'एकमत' झालं असेल तर ते तसं सांगण्याची तसदी कीतीजण घेतात?

इथं 'सहमत' ह्या शब्दाला माझा आक्शेप आहे. कारण चर्चेतील एखादा मूद्दा पटला तर 'एकमत' हाच शब्दप्रयोग योग्य असतो. जीथं सहकार्य अपेक्शीत असते तीथं 'सहमत' हा शब्द प्रयोग योग्य असतो. कारण जीथं 'सहमती' नसते तीथं 'असहकार' असतो व जीथं 'एकमत' नसतं तीथं 'दूमत' असतं - असे मला वाटते.

माझी सगळ्यांना वीनंती आहे की, प्रतीसाद देताना सूरवातीला तीन ओळी सोडून द्याव्यात. नाहीतर पहीलं वाक्य वाचता येत नाही.