दुसरे म्हणजे चर्चेत सहभागी होताना मी म्हणतो तेच बरोबर, तुमचे चूक(च) आहे हा दृष्टीकोन चर्चा पुढे नेऊ शकत नाही. (हे प्रस्ताव मांडऱ्यांना तसेच भाग घेणाऱ्यांना लागू होते.) शेवटी हेही लक्षात ठेवले पाहिजे की चूक किंवा बरोबर हे तसेच त्याची तीव्रता सापेक्ष असते. तसेच उपहास हा सतत येत राहिला तर तो हासरा न राहता बोचरा होऊ शकतो.
अगदी नेमके लिहिले आहे. पूर्णपणे सहमत आहे.