इंडीक इनपुट एक्सटेंशन चांगले आहे. मी मराठी इनस्क्रिप्ट हा कळफलक वापरून टंकून पाहिले. अर्धचंद्राकृती र (तऱ्हेवाईक, हऱ्यानाऱ्यातला) व्यवस्थित उमटतो आहे. विसर्गचिन्हदेखील. संक्षेपचिन्ह (॰), अ‍ॅ, आणि झिरो विड्थ जॉइनर(ZWJ), झीरो विड्थ नॉन-जॉइनर (ZWNJ) देण्याची सोय (रिचर्ड्‌स, अन्‌डरस्टॅंडिग मधले) असल्यास बहार येईल. कळफलक साहाय्य कुठे उपलब्ध आहे?