ही बातमी मीही वाचली. पण अमेरिकेतूनच मऱाठी मंडळींना विरोध होईल असे वाटले नव्हते. निदान आतातरी ठाले वगैरे प्रभृती काही विचार करतील असे वाटते. साहित्य परिषदेच्या ज्या प्रतिनिधींनी या महामंडळाच्या बैठकीत अमेरिकेतील संमेलनाला पसंती दिली, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा विचार आम्ही काही'गावाकडचे' सदस्य करीत होतो, तेवढयातच ही बातमी आली. त्यामुळे राजीनामा वगैरे विचार बाजूला ठेऊन आता पुढे काय होते ते पाहायचे.