बघा! अहो हे चित्रपटवाले आपली भव्य संस्कृतीच नकळतपणे जपत आहेत. सीतामाई नेहमी रामाच्या लेफ्ट ह्यांडला उभी असते. शंकरभगवान नंदीवर बसून टूरला निघाले की पार्वतीमाय फोटोमध्ये डाव्या साईडला येईल अशा पद्धतीनेच नंदीवर बसते. एवढेच कशाला, युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असलेल्या इट्टलाची रखुमाईही वामांगीच असते.
त्यातलाच हा एक प्रकार समजायचा!