स्पीड = चाल : तो जोरात/वेगात/भराभरा चालतो: तो चालीत चालतो? का भराभराप्रमाणे चालचाल चालतो?

विद्युत प्रवाह: हा शब्द विद्युत्‌ प्रवाह किंवा विद्युत्प्रवाह असा लिहायला हवा.  म्हणजे तो अवघड झाला, म्हणून विजेचा प्रवाह हाच योग्य.  याला विरोध का असावा? 

विद्युतधारा: यापेक्षा विजेचा प्रवाह.  आपण पावसाच्या काय जलधारा पडत आहेत असे कधी म्हणत नाही. पावसाची/पाण्याची/दुधाची/तेलाची/तुपाची धार चालते म्हणून विजेची धार चालेल?

धाराविद्युत: याचा अर्थ विजेचा प्रवाह नक्की होत नाही, फारतर प्रवाही वीज किंवा चलविद्युत असा होईल. 

विद्युतदाबः व्याकरणदृष्ट्या चूक.  विद्युद्दाब असे हवे, म्हणजे परत अवघड. रस्त्यावरच्या विजेच्या खांबपेटीवर धोका विजेचा दाव ४४० व्होल्ट्‌स असे काय उगाच लिहितात?

टॅन्जन्टसाठी स्पर्शरेषा फार पूर्वीपासून वापरात आहे.  स्पर्शिका शब्द नवीन दिसतो. स्पर्शिणारी रेषा आहे, वर्तुळ किंवा अन्य आकृती नाही हे सांगणे महत्त्वाचे आहे.

तत्का(ल)ळ म्हणजे एकदम, चटकन, तडकाफडकी, तत्क्षणी, ताबडतोब, तिथल्या तिथे, तेव्हाच, त्वरित, पटकन, लगेच, लागलीच, वेळ न दवडता, जलदीने, तातडीने, त्वरेने, विनाविलंब, सत्वर, इ.इ. 'तत्काल', 'तत्काळ'पेक्षा अधिक योग्य कारण त्यापासून तत्कालीन, तात्कालिक असे शब्द बनवता येतात. तत्काळपासून काही बनत नाही, एरवी 'तत्काळ' चालेल.

तात्काळ हा शब्द व्याकरणदृष्ट्या आणि शुद्धलेखनदृष्ट्या चुकीचा.  शब्दकोशात कदाचित सापडेल, तरीसुद्धा चुकीचा.

तात्कालिक हा तात्पुरता, त्याकाळापुरता अशा अर्थाने योग्य शब्द.

स्थैतिकचा अर्थ स्थितीसंबंधी. दंगल भागाचा स्थैतिक अहवाल काय म्हणतो?  इथे योग्य आहे. साधे 'स्थिर', 'अचल' हे शब्द असताना केवळ स्टॅटिकशी उच्चारसाम्य म्हणून स्थैतिक मुलांच्या डोक्यात घुसवू नये.