इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्यापेक्षा मराठी शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द शोधावेत, म्हणजे मराठी शब्द नैसर्गिक ठरतील.
उदाहरणार्थः
वेग-मराठी नेहमीचा शब्दः इंग्रजी अर्थात स्पीड.
गती-मराठीः इंग्रजी उघडउघड मोशन.
प्रगती(फॉरवर्ड), पुच्छगती(बॅकवर्ड), ऊर्ध्वगती(अपवर्ड), अधोगती(डाउनवर्ड), चक्राकार/चक्रगती(स्पिनिंग/रोटेशनल) मोशन.
विजेचा प्रवाह-मराठी. इंग्रजी इलेक्ट्रिक करन्ट.
विजेचा दाब-मराठी. व्होल्टेज(इं).
गोलगोल/गरागरा/चक्राकार फिरणे, चक्कर(येणे)-मराठी. स्पिन(इं)
वीज-मराठी. इलेक्ट्रिसिटी, लाइट्निंग(इं).
स्थलान्तर-मराठी. डिस्प्लेसमेन्ट(इं)
असा विचार करावा आणि आपोआप उत्तम प्रतिशब्दांचा कोश(प्रतिशब्दकोश नव्हे!) तयार होईल.