विद्युद्दाब हा व्याकरणदृष्ट्या, लेखनदृष्ट्या बिनचूक हे मान्य. पण त्यात कठीण ते काय? उद्दाम, मुद्दाम तसे विद्युद्दाब हे उच्चारणाच्या दृष्टीने कठीण वाटत नाही. तेच स्थैतिक चे. नैतिक, भौतिक तसे स्थैतिक सुद्धा. दंगलीचे उदाहरण हा शास्त्रीय पारिभाषिक शब्दाचा विपर्यास आहे.विद्युत च्या संदर्भात स्थैतिक विद्युत किंवा स्थिरविद्युत हेच बरोबर.

टॅंजन्टसाठी मी तरी शालेय शिक्षणात स्पर्शिका हाच शब्द शिकलो आहे. पुढे महाविद्यालयीन व उच्च शिक्षणात टॅंजन्ट हा.स्पर्शिका या शब्दातच स्त्रीलिंगी भूमितीय आकृतीचा (रेषा) बोध होतो. त्रिज्या, जीवा यांचेही तसेच. रेषेतर आकृत्यांच्या संदर्भात मी तरी 'स्पर्श करणारा...','स्पर्श करणारे... ', 'स्पर्श करणारी... ' हेच शब्दप्रयोग पाहिले/वाचले/वापरले आहेत.

शब्दकोश, शासकीय कामकाजाची कागदपत्रे अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाहिले/वापरले आहे.तात्काळ आणि तत्काल/तत्काळ यात उच्चारणाच्या दृष्टीने सोपे-कठीण असण्याच्या बाबतीत डावेउजवे करणे कठीणा आहे; मात्र प्रचलित शब्दांच्या हकालपट्टीचा अट्टाहास नसेल, तर तात्काळ ला का आडकाठी?तकाळपासून इतर काही शब्द बनत नाहीत जे तत्काल पासून बनतात म्हणून तत्काल वापरावे हे समर्थन निव्वळ हास्यास्पद/लंगडे वाटले. चू भू द्या घ्या