मी शाळेत मराठी माधमातून विज्ञान विषय शिकताना स्पीड साठी गती, (बहुतेक मोशन साठी चाल), विद्युत्प्रवाह वा विद्युतधारा, स्थैतिक विद्युत व धाराविद्युत, विद्युद्दाब (खरे तर हा शब्द पाठ्यपुस्तकात विद्युतदाब असाच (चुकीचा असला तरी) लिहिला जातो) असेच शब्दप्रयोग पुस्तकामध्ये होते. ते (माझ्यामते) मराठी पाठ्यपुस्तक महामंडळाने प्रमाणित केलेले शब्द आहेत त्यामुळे ते आता (किमान शिक्षक आणि शालेय मुलांमध्ये) प्रचलितही आहेत, ते माझ्यामते बदलण्याचे काहीच कारण नाही. शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून स्थैतिकविद्युत मुलांच्या डोक्यात पाठ्यपुस्तक महामंडळाने अनेक वर्षांपासून घुसविलेली आहेच, ती आता बाहेर काढत बसू नये असे वाटते.
चार्ज साठी प्रभार असा शब्द आहे, तर भार हा शब्द दाब ह्याअर्थी वापरतात.
तत्काल ह्या व्याकरणदृष्ट्या योग्य शब्दाचे तात्काळ असे मराठीकरण झालेले आहे, (जसे मंजरी चे मंजिरी, अजागल चे अजागळ, मालाचे माळहे मराठीकरण आहे तसे) त्यामुळे मराठीत तात्काळ का शब्द आहे.