त्या ५ पैकी कोणत्याही २ खोक्यांची वजने समान असणे शक्य नाही- अन्यथा जकातनाक्यावर केलेली कमीत कमी २ वजने समान आली असती.
म्हणून असे समजूया की त्यांची वजने अ < ब < क < ड < ई अशी आहेत.
अ < ब < क < ड < ई ===> यातील २-२ संख्यांच्या बेरजा करून त्या चढत्या क्रमाने लावण्याचा प्रयत्न केल्यास खालील ४ गोष्टी नक्की ठरवता येतील,
(अ+ब) हे सर्वात कमी असेल (११०) व त्यानंतर (अ+क) (११२)
तसेच
(ड+ई) हे सर्वात जास्त असेल (१२१) व त्याआधी (क+ई) (१२०)
आता जकातनाक्यावरील सगळ्या वजनांची बेरीज केल्यास
(अ+ब)+(अ+क)+(अ+ड)+(अ+ई)+(ब+क)+(ब+ड)+(ब+ई)+(क+ड)+(क+ई)+(ड+ई)=११०+११२+११३+११४+११५+११६+११७+११८+१२०+१२१
म्हणजे ४ (अ+ब+क+ड+ई) = ११५६
म्हणून ११० + क + १२१ = ११५६ / ४ = २८९ ====> म्हणून क = ५८
म्हणून अ = ११२ - ५८ = ५४
ब = ११० - ५४ = ५६
ई = १२० - ५८ = ६२
ड = १२१ - ६२ = ५९