खादाड बोका यांना...

डिंक कसा असतो?   चिकट की चिटक?
डिंक चिकट असेल तर चिकटवणे... आणि चिटक असेल तर चिटकवणे. :) पण माझ्या मते डिंक चिकटच असतो. :)

शुद्ध शब्दांच्या संदर्भात सिनेमा-सीरियल्सच्या कुठे नादी लागताय राव?

तिने मला खाली दाखवलं... असं एक मराठी वाक्य मी अलीकडेच एका मालिकेत ऐकलं होतं... उसने मुझे नीचा दिखाया ची ही कॉपी टू कॉपी... माशी टू माशी!!!  मालिकांमधील मराठी भाषा ही अशी...! काय काय बघावं लागणार आहे, कुणास ठाऊक बिचारीला ! (तिला नव्हे हो... आपल्या मायमाउली मराठीला! ). आपणही बघत राहायचं ... नीचा तर नीचा... दाखव बाई दाखव... अजून असं किती खाली बघावं लागणार आहे, तीच (हो.. हो... आपली मराठीच! ) जाणे!