बरोबर! बऱ्याचदा कानावर चुकीचे शब्द 'चिटकवले' गेले की उगाच 'चिकटपणा'बद्दल शंका येते. तेव्हा चिटक नव्हे 'चिकट'च बरोबर असं  वदवून घेण्यासाठी आणि आपणांसारख्यांच्या साथीने अयोग्य शब्दप्रयोग करणाऱ्यांना जोरात ओरडून सांगण्यासाठीचा हा खटाटोप!

पण या निमित्तानं तुम्ही दिलेली मालिकेतली उदाहरणं मात्र अगदी झकास!

बाय द वे, मी साधारणपणे एक महिना निरिक्षण केलं आजुबाजुला. 'अरे काय चिकट चिटकवलंस रे', असे म्हणणारे महाभागही भेटले.