रत्नमाला!! तीर्थाच्या झारीतून टीचर्स? ;)

’तक तक तक’ अशी पुनरावृत्ती झाल्यामुळे गाण्याला एक आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आमच्या कोकणातल्या वळणावळणाच्या रस्त्यांवर गाडी चालली की आमचे शरीर असे आंदोलित होते मंडळी. त्याच्या रेड्यालाही पतियाळातल्या गोंडस म्हशी बघायला मिळतील. मात्र तुम्ही आपल्यासमोरचा वरणभात मुकाट्याने खा! ’सब सूझबूझ होश गवाके’. अहो मंडळी तुकोबांनी तरी वेगळे असे काय म्हटले आहे? मल्लिका आधीच इतकी टाईट आहे की तिला अजून टाईट व्हायची काही गरजच नाही. टल्ली हा शब्द ’तल्लीन’ या शब्दाशी किती जवळीक साधणारा आहे! हा आता काही करड्या जिभांचे लोक याला कंपूबाजी करून टल्ली होणे म्हणतील पण तो त्यांच्या ऱ्हस्वदृष्टीचा दोष आहे मंडळी. शिवास रीगलचे दोन पेग लावून कळफलक बडवणे हीच तर खरी साहित्यसेवा आहे मंडळी.