>विच हा एक बोलीभाषेतला शब्द आहे मंडळी.
'विच' या शब्दाचा अर्थ मला वाटते की मराठीतल्या 'ला' किंवा 'मध्ये' सारखा होतो. सुखविंदरच्या 'दिलविच हलचल कर गयी, अखियोंसे गल कर गयी' गाण्यात मस्स्त उपयोग केला गेला आहे या शब्दाचा असे वाटते.

>हे गाणं ऐकलं (आणि विशेषत: पाहिलं) की मन बेचैन होऊन जातं.

गेल्या जवळपास ६ वर्षांपासून दूदचे( दूरदर्शनचे हो.. ) दूरूनही दर्शन घेण्याचे भाग्य (?!) लाभले नसल्याने गाणी बघण्याचे योग काही येत नाहीत. रेमि ( रेडिओ मिर्ची ) आणि विभा ( विविधभारती ) यांच्यामुळे श्रवणभक्ती करायचा चान्स मिळतो पण तोही सकाळी ७ ते ८ आणि संध्याकाळी ९ ते १० पर्यंतचा.. ज्यात हे गाणे ऐकायचे सुख (?!!) प्राप्त झालेले नाही. त्यामुळे चैनीत आहेत मी अगदी. :))

गाणे गुणगुणण्याबद्दल म्हणायचे तर सकाळी उठल्याउठल्या जे गाणे मनात येते तेच दिवसभर गुणगुणले जाते त्यामुळे आजचे गाणे आहे.. भीगी भीगी भीगी जादूगरी, लम्होंकी बातें.. देखो करने लगी हूं, मैं बूंदोंसे बातें.. अरे वा ! यातही आहेच की लाटानुप्रास अलंकार ! :)

अजानुकर्ण,
'मै टल्ली हो गयी' सारखी गाणी सर्रास सर्व वाहिन्यांवर दाखवली जातात म्हणे. असे असताना छोट्या मुलांना बघायला कोणत्या वाहिन्या परवानगी द्यायची ते कळेनासे होते. शिवाय अशा गाण्यांच्या बातम्याही होतात असे ऐकले आहे.. म्हणजे तर अगदी जय जय रामकृष्णहरीच ! लेखाचा रोख कळला आणि त्याबद्दल अगदी सहमत.