>खरंच खरी मैत्री एवढी दुरापास्त आहे?
अजिबात नाही.
>व्यावहारिकतेच्या, धावपळीच्या आयुष्याच्या, अर्थाजनाच्या बंधनांनी तिला जखडून, संपवून टाकलंय?
मुळीच नाही.
> कधीतरी हॉटेलात जाणं, फोनवर बोलणं, एसएमएस करणं, यापलीकडे मैत्री जाऊ शकत नाही?
अग्गदी काहीच कुठलाच संपर्क नसतानाही मैत्री/दोस्ती असते आणि टिकतेही.
>नोकरी, जबाबदाऱ्या यांची बंधनं मैत्रीच्या नात्यापेक्षाही तीव्र असतात?
अशी तुलना कशी होऊ शकते? दोन्हीच्या पातळ्या वेगवेगळ्या आहेत शेवटी.
>चांगल्या मैत्रीची गरज काय फक्त एकटेपणीच असते?
माणूस कायमच एकटा असतो..
> अगदी जगण्याचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू असतानाही मित्रांशी उत्तम नातं नाही राखता येत?
येतं की !
अभिजित,
नाते मग ते कुठलेही असो, अपेक्षा आली की संपले सगळे. निरपेक्ष दोस्ती करून बघ.. थेंबाचा परतावा समुद्राच्या स्वरूपात मिळेलच मिळेल... किमान माझातरी तसा अनुभव आहे. दोस्ती अमुकशी केली म्हणून त्याच्याचकडून परतावा मिळेलसे नाही तर एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडूनही तो मिळू शकतो... तसा तो मिळण्यात किती अपार सुख आहे ते सांगून समजवून देता येण्यासारखे नाही.