मिलिंद सर,
शिकागो विद्यापीठाचा हा उपक्रम छान आहे पण त्याच्या अचूकतेबद्दल थोडीशी शंका येते. तिथे मला जाह्नवी हा शब्द सापडला नाही तर जान्हवी असा शब्द सापडला. माझ्या माहितीप्रमाणे जह्नु, जाह्नवी, ब्रह्म, ब्राह्म, ब्राह्मण हे योग्य शब्द आहेत. सहसा ह च्या आधी म/न लावला जात नाही, म/न च्या आधी ह लागतो. ह्याच शब्दकोशात मला ब्राह्म-ब्राह्मण ब्राह्म-ब्राह्मण असे शब्द सापडले आणि ब्राम्हणी ब्राम्हणी असाही शब्द सापडला. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.