तो ठोकळा शंकू(कोन) च्या आकाराचा असावा असे वाटतेय.
या शंकूच्या तळाचा(बेस) व्यास हा कोरल्या जाणाऱ्या वर्तुळाच्या व्यासाएवढा/चौरसाच्या बाजूइतका असावा आणि उंची कोरल्या जाणाऱ्या त्रिकोणाएवढी (म्हणजेच कोरल्या जाणाऱ्या वर्तुळाच्या व्यासाएवढी/चौरसाच्या बाजूइतकी) असावी.
असे असल्यास, कोरलेल्या आकारांतून शंकूच्या आकाराचा ठोकळा आरपार जाताना वर्तुळ, चौरस आणि त्रिकोण या आकारांसाठी खालीलप्रमाणे कसोटीवर उतरेल;
१. वर्तुळ- शंकूच्या तळाचा परिघ वर्तुळाच्या परिघाला पूर्णपणे घासून जाईल.
२. चौरस- चौरसाची बाजू आणि वर्तुळाचा व्यास(म्हणजेच शंकूच्या तळाचा व्यास) सारखा असल्याने शंकूच्या तळाचा परिघ चौरसच्या चारही बाजूंना घासून जाईल.
३. त्रिकोण- शंकूची उंची त्रिकोणाच्या उंचीएवढी असल्याने त्यातून शंकू उभा करून आरपार सरकवल्यास (प्रश्नामध्ये कोरल्या जाणाऱ्या त्रिकोणच्या तळाबद्दल काही उल्लेख नसल्याने तळाची लांबी ही उंचीइतकी मानली आहे) त्रिकोणाच्या तळाला शंकूचा तळ आणि उरलेल्या २ बाजूंना शंकूचा पृष्ठभाग (तळाव्यतिरिक्त) घासून जाईल.