चौघीजणी मी नुकतंच वाचलं आणि ज्यो माझ्यात भिनलीच जणू. तिच्यात आणि माझ्यात अतोनात साम्य असल्यासारखं आजही वाटतंय.तिचं बेथवरचं, आईवडलांवरचं अतोनात प्रेम तर क्या कहने ! लॉरीशी तिची असलेली निख्खळ दोस्तीही अगदी बालरम्य आठवणीत रमायला लावणारी.. पण तरीही लॉरीने तिला मागणी घातली तेव्हा उगाच जीव खालीवर झाला होता आणि खूप वाटलं होते की तिने त्याला नाही म्हणावे. तसेच झाले आणि तिचा 'नवा दोस्त' तिचा जीवनसाथी होण्यामागची कारणे, तशी ती होतानावेळची तिच्या मनातली आंदोलने आणि अगदी अलगदपणे वळणे घेणारे ते प्रसंग.. निव्वळ अप्रतिम. पुस्तक वाचून संपल्यावर मात्र का कोण जाणे लॉरीपेक्षा ज्योचा हा नवा दोस्तच जास्त मनावर छायलाय माझ्या ! ज्योचा संसार मनावर अग्गदी खोल परिणाम साधून आहे माझ्या..
पाडस एका दोस्ताकडून भेट जरी मला मिळाले असले तरीगी घरी सर्वांचे वाचून ते आता कुठे माझ्या हाती आले आहे ! वाचते आहे.. कळेलच फ्लॅगला गोळी का घातली ते.. सध्ध्यातरी फॉडरविंग गेला तर त्याच्या अंत्यसंस्काराच्यावेळी पेनीने केलेली प्रार्थना मनात रुंजी घालत आहे.
लहानपणी पुस्तके विकत घेणे ही एक चैन होती - जिच्याकरता पैसे साठवावे लागायचे, नाहीतर ती जिंकावी लागायची आईबाबांच्या चाचण्यांमध्ये पास होऊन. फाफेचे बरेच भाग होते त्यामुळे तो हाती यायच्या आधी गोट्या, चिंगी आले.. पण त्याहून जास्त जर कोणाचा ठसा माझ्या बालमनावर उमटला असेल तर तो आहे 'खडकावरल्या अंकुर'चा. निव्वळ अप्रतिम पुस्तक. आजही त्या अंकुराला भरल्या ताटावरून उठवल्या जाण्याचा तो प्रसंग अंगावर रोमांच उभे करतो माझ्या.
चौघीजणी आणि पाडस वाचायचा मुहूर्त आत्ताकुठे निघाला त्यामुळे ह्या लेखाची आठवण येऊन आवर्जून प्रतिसाद द्यावेसे वाटले. पुस्तक वाचण्यातच नाही तर त्यामुळे या लेखाला प्रतिसाद देण्यातही लेटलतीफ झालेय खरी पण..