स्मिता, मला करायचा असता तर मी खालीलप्रमाने अनुवाद केला असता.

मोडलं रे...
खेळणे मनाचे बघ की मोडलं रे

मोडलं रे...
खेळणे मनाचे बघ की मोडलं रे
कुणा लुटारूने येऊन लुटून नेले
हाय कुणा लुटारूने येऊन लुटून नेले
खेळणे मनाचे बघ की मोडलं रे \-२

घडला कसूर हातून कुठला रे माझा \-२
निघतांना घातलीस ना सादही मला \-२
प्रीतीची लय बिघडवलीस,
मला प्रवाहात सोडलीस
मी तर चाललेले मदतीने तुझ्या
सोबती माझा, हरपून गेला

कसे परदेशीया तू प्रेम जडवलेस \-२
सुख ही गमावले, निद्रासुखही गमावले \-२
तुझा भरवसा करून,
तुझी प्रतीक्षा करून
सुखाऐवजी दु:खाचे रचले पहाड
दुष्ट समाज मजवर रुष्ट झाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७०४